जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक : 2023

TCS IBPS पॅटर्न
0
🔷 जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक : 2023

◆ जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) निर्देशांकामध्ये जगातील आघाडीच्या 55 देशांमध्ये भारत 42 व्या स्थानावर आहे. अमेरिकेतील ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने हा निर्देशांक जाहीर केला आहे.

◆ बौद्धिक संपदेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विकसनशील बाजारपेठांचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असल्याचे हे निदर्शक असल्याचे ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने म्हटले असले तरी, आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकेतील देशांपेक्षा भारत पिछाडीवर आहे.

➤ निर्देशांकानूसार पहिले पाच देश :-
1) अमेरिका, 2) ब्रिटन, 3) फ्रान्स, 4) जर्मनी, स्वीडन

➤ निर्देशांकानूसार भारताची स्थिती :-
◆ 2023 :- 42 व्या स्थानी
◆ 2022 :- 43 व्या स्थानी

➤ भारताच्या शेजारील देशांची स्थिती :-
◆ चीन :- 24 व्या स्थानी
◆ पाकिस्तान :- 52 व्या स्थानी

➤ रशिया आणि युक्रेनची स्थिती :-
◆ रशिया : 54 व्या स्थानी
◆ युक्रेन : 41 व्या स्थानी

◆ चेंबरच्या ‘ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राईड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर भारताचा आर्थिक प्रभाव वाढत आहे. स्वामित्व हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी भारत करत असलेल्या उपाययोजनांची अहवालात दखल घेण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top