चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३

TCS IBPS पॅटर्न
0


चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३

 महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……  

(Q१) चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर चे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले. त्याला कोणते नाव देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे?
Ans- शिवशक्ती स्थळ

(Q२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे?
Ans- २३ ऑगस्ट

(Q३) चांद्रयान-२ ने २०१९ मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला. त्या जागेला कोणते नाव देण्यात येणार आहे?
Ans- तिरंगा पॉईंट

(Q४) सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ यानाचे प्रक्षेपण कधी करण्याचे इस्रो चे नियोजन आहे?
Ans- २ सप्टेंबर

(Q५) स्टेट ऑफ इंडियन बर्ड च्या अहवालानुसार राज्यात पक्ष्याच्या ४ प्रजातीच्या संख्येत किती टक्के घट दर्शवली आहे?
Ans- ५० ते ८०%

(Q६) भारत हा जगातील कितवा क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे?
Ans- चौथा

(Q७) भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रनॉय ने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Ans- कास्य

(Q८) नाईट फ्रॅंक अँड नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल च्या अहवलानुसार देशातील बांधकाम क्षेत्राची वाढ २०४७ पर्यंत किती लाख कोटी डॉलर होण्याचा अंदाज आहे?
Ans- ५.८ लाख

(Q९) देशातील बांधकाम क्षेत्राचे GDP तील योगदान सध्याच्या ७.३% वरून किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?
Ans- १५.५%

(Q१०) भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने IBSA जागतिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Ans- सुवर्ण

(Q११) भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने ISBA जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या संघाचा पराभव केला?
Ans- ऑस्ट्रेलिया

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षिका—- यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे?
Ans- मृणाल गांजाळे

(Q१३) महाराष्ट्रतील कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे एकत्रिकरण करून समूह शाळा सुरु करण्याच्या पहिला प्रयोग कोणत्या जिल्यानी केला आहे?
Ans- पुणे व नंदुरबार

(Q१४) बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?
Ans- सुवर्ण

(Q१५) जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत विश्वविजेता ठरणारा निरज चोप्रा हा कितवा भारतीय अथेलिट आहे?
Ans- पहिला

(Q१६) जगातील रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?
Ans- दुसरा

(Q१७) जगात एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
Ans- अमेरिका

(Q१८) भारताची सध्या रस्त्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
Ans- ६३.७२ लाख

(Q१९) जगामध्ये रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या आमेरिकेच्या रस्त्यांची लांबी किती किलोमीटर आहे?
Ans- ६८.३ लाख

(Q२०) द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशात प्रथम आलेली राशी पारख ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची आहे?
Ans- कोल्हापूर

(Q२०) द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशात प्रथम आलेली राशी पारख ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची आहे?
Ans- कोल्हापूर

(Q२१) शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचे संपादन कोणी केले आहे?
Ans- सदानंद मोरे

(Q२२) इमर्सन मनंगागवा यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली?
Ans- झिम्बाबे

(Q२३) झिम्बाबे देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत इमर्सन मनंगागवा यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
Ans- ५२.६%

(Q२४) कोणत्या देशात होणाऱ्या ब्राईट स्टार युद्धसरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार आहे?
Ans- इजीप्त

(Q२५) कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३०% ऐवजी ३५% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे?
Ans- मध्यप्रदेश

(Q२६) पश्चिम विभागीय आंतरराज्य परिषद कोणत्या राज्यात होणार आहे?
Ans- गुजरात

(Q२७) गुजरात येथील गांधीनगर येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय अंतररराज्य परिषद होणार आहे?
Ans- अमित शहा

(Q२८) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशातील FDI मध्ये किती टक्के घट झाली आहे?
Ans- ३४%

(Q२९) चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात किती अब्ज डॉलर येवढी परकीय गुंतवणूक झाली आहे?
Ans- १९.९४

(Q३०) चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली आहे?
Ans- ४.४६

(Q३१) जि-२० अंतर्गत व्यपार व गुंतवणूक कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक कोठे संपन्न झाली आहे?
Ans- जयपूर

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top